Friday, 31 March 2023

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र /लेखिका -काशीबाई कानिटकर


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं.

आपल्या नवऱ्याच्या भरभक्कम साथीने त्या घरातील आणि समाजातील निंदा नालस्ती ला पुरून उरल्या.स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा कायमचा उठवला


डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
लेखिका:काशीबाई कानिटकर
दुसरी आवृत्ती:१९१२
चौथी आवृत्ती:२०१९(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पेज:३२८ मूल्य:३५०/

ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक  सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.

या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, 
“सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. 
कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. 
तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. 
काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. 
अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 
अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे.
याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.

Thursday, 30 March 2023

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

जगभर ज्या पुस्तकाची सातत्याने वाढती चर्चा आणि वाचन चालू असते ते म्हणजे इकिगाई!

तुम्हाला जेंव्हा केंव्हा थोडंसं ही बोर होऊ लागलं किंवा रिकामे वाटायला लागलं की हे पुस्तक काढावे आणि पुन्हा वाचावे!

शरीर मन आणि बुद्धी सतत ताजे तवाने ठेवू शकतो आपण!

आज आपण तरुण आहोत.हाताला काम आहे.नाती गोती मित्र मैत्रीण आहेत.वेळच नाही पुस्तकं वाचायला.ठीक आहे नका वाचू भरपूर पुस्तकं...पण हे पुस्तक नक्की वाचा.उत्तर आयुष्यातील एकाकीपणाची कल्पना करून वाचावे....अख्खे जीवन सुखी जाईल!

हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायचे असल्याने हार्ड कव्हर असलेलेच विकत घ्यावे.भेट द्यावे.

हार्ड कव्हर पुस्तकाची किंमत:३९९/


प्रत्येक निवृत्त व्यक्तीस  कॉमन प्रश्न पडतात..?
•वेळ कसा  घालवायचा ?
•आपण वयस्कर झालोत का?
•आरोग्य साथ देईल का?
•घरात स्वतंत्र स्थान राहील का?

या सर्व प्रश्नापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाने वाचावे "इकिगाई "

इकिगाई म्हणजे आवडती गोष्ट करण्याची स्फूर्ती व त्यापासून  मिळणारा आनंद ही व्याख्या बरोबर आहे.  इकिगाई हा मूळ शब्द जपानी.  मला मराठी पुस्तक वाचायला मिळाले हे माझे भाग्य आहे. इकिगाई या इंग्रजी पुस्तकाच्या उत्तम मराठी अनुवाद  करण्याचे आभार जातात ते प्रसाद ढापरे यांना,  की ज्यांनी हे उत्तम मराठी अनुवादित पुस्तक आम्हा मराठी रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले.

"इकिगाई" मनाला चिरतरूण करते.
खरंखुरं आनंदी जीवन जगायला शिकवते. भरपूर अर्थार्जन केले की संपन्नता आली हा गोड गैरसमज आहे,  पण असे नाही, हे या पुस्तकातून शिकता आले.  अर्थार्जनाखेरीजही कला, कौशल्य,  वाचन,  स्वयंपाक,  गाणं,  भजन,  पर्यटन,  नातेवाईक भेटी, समाजकार्य, लेखन,  यासारखे अनेक छंद पूर्ण करायचे राहून गेलेले आहेत,  हे लक्षातच येत नाही.

खरे तर वय वर्षं 60 झाले,  मी थकले/थकलो हे म्हणणे अत्यंत भ्याडपणाचे लक्षण आहे, हे म्हणण्याचे धाडस येते हे पुस्तक वाचले की.  थकण्याचे हे वय नाहीच मुळी. उलट वयवर्षे 60 ते 70 हा काळ स्वतंत्र जगायचा. म्हणजे दिवसाच्या 24 तासांचे मालक तुम्हीच.  मुक्तछंदाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा काळ.

बांधीलकी, जबाबदाऱ्यांतून मुक्त होतोय याचा अर्थ असा नव्हे की, येथून पुढची दैनंदिनी आराम आराम आणि आरामच करायला पाहिजे.  मंडळी, माहित आहे ना, पंडित चाचा नेहरू  म्हणायचे "आराम हराम है !"  तेच तर करायचेय आरामाला टाटा, बाय बाय करून छंद व आरोग्य जोपासण्यासाठी वेळ कामी लावायचा हे शिकवले "इकिगाई" नी.आणि उमगले प्रत्येकाचा इकिगाई कशात ना कशात दडलेला आहे.

सतत खाणे, पोटभर जेवणे व टीव्ही मोबाईलमध्ये  सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनच्या आधीन होणे ही न सुटणारी व्यसने आहेत.    फेसबुक,  व्हॉटसअँपवर स्क्रोलिंग होत राहणार आहे,  त्याला अंत नाही.  ते एक खेळणं म्हणून मनुष्य वापरतोय आणि मनुष्य कळसूत्री बाहुला झालाय हे कुठेतरी थांबायला हवय हे मनापासून वाटत इकिगाई वाचनानंतर.

पुस्तके सावलीसारखी पाठीशी असतात,  हे मनावर बिंबलय लहानपणापासून. ते आज इकिगाईनी सिध्द केलय.

भूकेपेक्षा कमी म्हणजे 100 ऐवजी 80 टक्के जेवण घेणे,  दैनंदिन व्यायाम-योगा व सतत कार्यमग्नता  ही त्रिसूत्री देणगी साठीनंतरचे निरोगी जीवन जगण्यासाठी मिळालीय इकिगाईतून.  इकिगाईमुळे एक मनुष्य नाही तर पूर्ण कुटुंब व पर्यायाने आपलाा देशही दीर्घायुषी होईल व सर्वाधिक निरोगी ज्येष्ठ  लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताची गणना होऊ शकेल.

आवडत्या माणसाच्या प्रेमात पडणे काय असते हे माहित होते,  पण आवडत्या पुस्तकाच्या प्रेमात पडणे काय असते याची अनुभूती मिळाली इकिगाईतून.  


येथील प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड काही ना काही कामात गुंतलेला असतो. बागकामापासून ते स्वयंपाक आणि इतर आवडीची कामे करण्यापासून ते वयाच्या ८८ व्या वर्षी driving करण्यापर्यंत. आहार पाहाल तर तो ही थक्क करणारा. आपल्याकडच्या सीनिअर सिटीझन ग्रुप्स मध्ये वय वर्षं ६० ते साधारण ९० पर्यंत वय असलेले नागरिक असतात. अगदीच कधीतरी ९५ च्या आसपास वय असलेले आजोबा किंवा आजी दिसतात. ओकिनावा मध्ये जो सीनिअर सिटीझन ग्रुप आहे त्यात वयाने सर्वात लहान सदस्याचं वय आहे ८३ आणि तिथून पुढे म्हणजे अगदी ११४ वयापर्यंत चे  'तरूण' लोकं. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे आणि तृप्तीची ढेकर देणारे आपण भारतीय असुदेत किंवा फास्ट फूड, जंक फूड ह्यांच्या संपूर्ण आहारी गेलेले ते अमेरिकन्स... आयुष्यभर इतकं मनसोक्त हवा तसा आहार असुन पण का वयाच्या चाळिशी नंतर तब्ब्येतीच्या एक एक तक्रारी आगंतुक पाहुण्यासारख्या येतात आपल्याकडे? का आपल्या देशांमध्ये आयुर्मानं कमी होत चालली आहेत? आणि तेच ओकिनावा मधील हे वयाची शंभरी ओलांडलेले पण मनाने कायम तरुण असलेले आजी आजोबा...

ह्या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तर आहेत हेक्टर गार्शिआ आणि फ्रान्सिस मिरेल्स लिखित इकिगाई ह्या पुस्तकात.

जपानमधील लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी अंगीकारलेली ही जीवनपद्धती केवळ थक्क करूनच नाही सोडत तर "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ह्या आपल्या मातीत जन्मलेल्या ओळींचा खरा अर्थ त्या शेकडो मैल दूर राहणाऱ्या जापनीज लोकांनाच खऱ्या अर्थाने उमगलाय ह्याची अनुभूती येते.



"इकिगाई...."
जे करत आहोत ते आवडीने करण्यापेक्षा आवड शोधून ते आनंदाने करणे कधीही जास्त आनंददायी.

"इकिगाई" ही जपानी संकल्पना आहे. इकीगाई म्हणजे आपल्या असण्याचं कारण, रोज सकाळी उठण्याचं कारण किंवा प्रयोजन. माणूस जे जगतो त्या जीवनाचा अर्थ, पॅशन किंवा आवड, हेतू समजणं किंवा माणूस ज्यासाठी जगतो ते काहीतरी सापडणं म्हणजे इकिगाई. 'इकिगाई' नावाचं नक्की वाचावं असं सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जगण्याचं रहस्य सांगितलं आहे. सतत व्यस्त राहण्यामध्ये आनंद आहे असे हे पुस्तक सांगते.

"जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतोच, काहींना तो मिळालेला असतो तर काही त्याला शोधत असतात."

 छंद जोपासणे, हलका व्यायाम, कधीही निवृत्त न होणं, ८०% पोट भरेल एवढं जेवणं, सतत सूप पित राहणं,  मित्र मैत्रिणी, आप्त यांना वेळ देणं, सक्रिय शरीर आणि मन, तणाव न घेणं, थोडं अवघड काम करणं अशा असंख्य गोष्टी जपानी जीवन पद्धतीचा भाग आहेत.
"गरज नसतानाही सतत कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला तुमचा इकिगाई माहिती असणं आवश्यक असतं. तुमचा इकीगाई तुम्हाला सतत लोकोपयोगी आणि आकर्षक गोष्टी बनवण्यासाठी प्रेरणा देत राहतो."

बऱ्याचदा आपण कमावण्यासाठी आयुष्यभर काहीतरी करत राहतो, त्यामागे धावत राहतो. पण आपण जे करत असतो तोच आपला ईकिगाई आहे का, आपण तेच करतो आहोत का जे आपल्याला करायला मनापासून आवडते, हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारतो का(साधारणपणे वयाच्या तिशीनंतर हा प्रश्न पडायला लागतो ज्याला midlife crisis असे ही म्हणतात.)
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून आपला इकिगाई शोधायला हवा, शोधता येतो खरं तर. आपला इकीगाई समजण्यात, आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने, वेगळ्या नजरेने पाहण्यात हे पुस्तक काही अंशी का होईना नक्की मदत करेल.

हे मूळचे इंग्रजीत लिहिले गेले आहे. खरं तर अशी जीवन जगायला शिकवणारी आणि प्रेरणादायी वर्गवारीतील पुस्तके मी कधी वाचली नाहीत. पण याचे नाव ऐकले होते, म्हणून घेऊन वाचले, आवडले.

"आनंदी राहण्यात दीर्घायुष्य आहे.

Sunday, 19 March 2023

पुस्तक:"पाकिस्तान अथवाभारताची फाळणी" लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

पुस्तक:"पाकिस्तान अथवा भारताची फाळणी"
लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1940 ला हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दृष्टा महापुरुष! तसेच ते अत्यंतिक राष्ट्रभक्त! त्यांनी आपले विचार भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मांडले.विरोध पत्करून कृती केली.जेंव्हा पाकिस्तान ची मागणी जोर धरत होती तेंव्हा हे  पुस्तक लिहिले.

 तत्कालीन परिस्थिती मुसलमान समाजाची मानसिकता , त्यांचा इतिहास , समाजातील स्त्रियांची स्थिती यावर परखड मत बाबासाहेब यांनी व्यक्त केले आहे . 

पृष्ठ:३३६ हार्ड कव्हर

मूल्य:४००
 
अनुक्रमणिका

● प्रस्तावना

भाग पहिला : पाकिस्तानकरता मुस्लिम जनतेची स्थिती.!

•भाग दुसरा : पाकिस्तानविरुध्द हिंदूंची विचारधारा

•भाग तिसरा : पाकिस्तानचा पर्याय.?

•भाग चौथा : पाकिस्तान ची संवेदना

•भाग पाचवा : पाकिस्तानच्या समस्या

•पुस्तक कसे आहे.? त्यातील एक पृष्ठ

लाला लजपतराय

लाला लजपतरायांनी सी.आर.दास यांना लिहिलेल्या पत्रात पुढील भीतीचा उल्लेख केलेला आढळतो...

 'दिवसापासून मला एका गोष्टीचे शल्य डिवचत आहे , त्यावर आपण जास्तीतजास्त सावधनपूर्वक विचार करू शकाल अशी मला आशा आहे . मी सहा महिनीच्यावर काळ मुस्लिम इतिहास आणि मुस्लिम कायद्याच्या अध्ययनात घालविला .त्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्य हे अशक्य व प्रयोगात आणण्यासारखे नाही अशी माझी स्पष्ट धारणा झालेली आहे ."

पुस्तकावर काही अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक वाचणे हेच चांगले.


Tuesday, 28 February 2023

रिच डॅड पुअर डॅड.... /लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी

               रिच डॅड पुअर डॅड.          

जे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला वाटते उशीर झाला.! 
आधी वाचायला हवे होते.!
प्रत्येक जाणते पालक आपल्या मुलाला वाचायला सांगतात ते पुस्तक.! 
आर्थिक क्षेत्रातील आपली दृष्टी व्यापक बनवणारे...
महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व घडवणारे पुस्तक! 
जे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे! 
भोळसट आर्थिक धारणा असलेल्या अप्त नातेवाईक मित्रांना आवर्जून भेट देण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले पुस्तकं..!


धन , संपत्ती जोडवी कशी या काळात याचे मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक..!

वन ऑफ द बेस्ट सेलर बुक:Rich Dad Poor Dad मराठीत..!
करोडो प्रती जगभर विकल्या गेल्या आणि विकल्या जात आहेत.
लाखो लोकांचे जीवनमान बदलून टाकणारे पुस्तक!
नक्की वाचावे...

पुस्तकाचे नाव: रीच डॅड पुअर डॅड (मराठी)

लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी

पृष्ठ:३०५
मूल्य:४९९/
"बेस्ट  वैयक्तिक अर्थकारणावरचे सर्वाकालीन क्र.1  चे पुस्तक !"


पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गींय शिकवत नाहीत.रिच डॅड पुअर डॅड-  रॉबर्ट टी. कियोसाकी या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अभिजित थिटे यांनी केला आहे.

 जागतिक कीर्तीच्या लेखकांनी प्राध्यापकांनी व व्याख्यात्यांनी वाचून दोन  ओळीत आपले अभिप्राय लिहिले आहेत त्यातील एक अभिप्राय -

आर्थिक परिस्थिती सुधरण्याची इच्छा असेल तर रिच डॅड , पुअर डॅड अवश्य वाचा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासाठी ते उपयुक्त आहे. -झिग झिगलर जागतिक कीर्तीचे लेखक आणि व्याख्याते

श्रीमंत कसं व्हायचं आणि असेलेलं कसं टिकवून ठेवायचं, या विषयीची साद्यंत माहिती, खरंतर शहाणपण हवं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा !! सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलानांही वाचायला लावा त्यासाठी गरज पडल्यास त्यांना लाचही द्यायला हरकत नाही. -मार्क व्हिक्टर हनसन सहलेखक, न्यूयॉर्क टाइम्स चिकतन सूप फॉर द सोल
 
रिच डॅड पुअर डॅड- हे  काही पैशांविषयीच्या इतर पुस्तकांसारखं नाही . एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्वाचे संदेशही सहजपणे उमगतील इतक्या सोप्या भाषेत आहेत.

मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं किंवा खरंतर माझ्या पालांनीच हे पुस्तक वाचणं जास्त उपयुक्त ठरलं असतं. तुम्हांला जितकी तुलं आहे त्या प्रत्येकाला हे पुस्तक विकत घेऊन द्या.

 नातवंडासाठीही काही प्रती खरेदी करुन ठेवा . मूल 8-9 वर्षाचे झालं की त्याला हे पुस्तक भेट म्हणून दयायलाच हवं.--(स्यू ब्रॉन-अध्यक्ष , टेनंट चेक ऑफ अमेरिका )

रिच डॅड पुअर डॅड- हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हांला तुमच्या आर्थिक बाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं.पैशावर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकवतं. तुम्हांला तुमची आर्थिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. (डॉ.एड कोकेन--अर्थशास्त्राचे प्राध्यापक , आरएमआयअी विद्यापीठ, मेलबोर्न)
 
हे पुस्तक मी वीस वर्षापूर्वीच वाचायला हवं होतं. --लेरीस क्लर्क -(डायमंड की होम्स, आयएनसी मॅगझीननं यांना १९९५ साली अमेरिकेतील सर्वात वेगानं वाढणारी कंपनी अशी मान्यता दिली आहे.)

आपल्या आर्थिक भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणा-या सर्वांसाठी रिच डॅड पुअर डॅड- ही प्राथमिक पायरी आहे. ---यूएसएटुडे

जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्यल विचार करण्याच्या पध्दतीला रॉबर्ट कियोसांकीनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रुढीबध्द शहाणपणाला सहसा छेद देणा-या दृष्टिकोनामुळे रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल परखडपणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिध्दी आहे. आर्थिक्‍ शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते.
 
लोक आर्थिकद्ष्टया ढगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष् शाळेत गेलेले असतात.पण पैशांबदद्यदल काहीच शिकलेले नसतात  परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधील शिकत नाही ---रॉबर्ट टी. कियोसाकी


Tuesday, 31 January 2023

पुस्तक - व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची / लेखक: डॉ गिरीश आफळे

"व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची"

"गांधीजी - नेहरू ने हम पठानोंका प्रदेश पाकिस्तान को तश्तरी में डाल के दे दिया और हमें इन चील कौव्वों सामने( पाकिस्तान मध्ये)मरने के लिए छोड़ दिया." - खान अब्दुल गफार खान

पुस्तक: व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची

लेखक: डॉ गिरीश आफळे

प्रस्तावना: प्रशांत पोळ

पृष्ठ:४८८

मूल्य:६००/



खैबर पख्तूनख्वा  हा प्रांत सरहद्द गांधी  म्हणून ओळखल्या गेलेल्या खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वात भारतात राहू इच्छित असताना नेहरूंनी मात्र तो पाकिस्तान ला भेट स्वरूपात दिल्या सारखा दिला...तेथील लोकांची इच्छा नसताना.तेथील प्रांतिक कायदेमंडळ हे मुस्लिम लीग चे नव्हते...ते काँग्रेसचे होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी लोकसंख्येच्या आदलाबदलीची मांडणी केली होती.परंतु काँग्रेस ने ही अदलाबदली धुडकावून लावली. जीना देखील लोकसंख्येच्या आदलाबदलीसाठी आग्रही असताना काँग्रेसने ही भयंकर चूक केली होती...ज्या काँग्रेस ला मुस्लिम मतदार संघात घोर पराभव झालेला होता.मुस्लिमांनी नाकारले होते....

जगातील सर्वात मोठ्या विस्थापनाच्या आणि हिंसाचाराच्या काळात काँग्रेस ने काय केलं?भारतात जीव मुठीत घेऊन पाळणाऱ्या हिंदू आणि शिखंच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी काही केले का? का आलेल्या बेघर निर्वासितांची काही सोय काँग्रेसने लावली? त्यांना अन्न, पाणी देऊ केले का?त्यांच्या निवाऱ्याची सोय केली? 
या प्रश्नांचे उत्तर शोधूनही "हो" असे सापडत नाही.प्रचंड मोठी असहकार आणि चलेजावची मोहीम राबवणाऱ्या काँग्रेसकडे आता मात्र माणसं नव्हती.

भारताची फाळणी अतिशय वेदनादायी होती. साधारणता पाच ते दहा लाख हिंदूं आणि शिखांना या फाळणीच्या दंगलीमध्ये फुटीर अतिरेक्यांनी मारले. बाटवले सर्वस्व लुटले. सुमारे दीड कोटी हिंदूंना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावे लागले. हिंदुस्तानची फाळणी ही हिंदूंच्या वंश विच्छेदाची सर्वात मोठी घटना! फाळणी खरंच अटळ होती का?
या संदर्भात आपल्याला अनेक असे मुद्दे आपल्याला सुन्न करून सोडतात....

हा ग्रंथ भारताच्या फाळणी पर्यंत न थांबता पुढं काश्मीर युद्ध आणि महात्मा गांधींची हत्या या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांना ही समाविष्ट करते..

या पुस्तकातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! 
५०० हून  अधिक स्वयंसेवकांनी  स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हिंदूंना सुखरूप भारतात पोहोचवले.त्या स्वयंसेवकांचे बलिदान कसं झाले, त्यांचे प्रयत्न आणि त्यांची पराकाष्ठा सर्व या पुस्तकात वाचायला मिळते.त्यांची नावे, गावे तपशीलवार वाचायला मिळते.शेवटचे प्रकरण नेहरू, पटेल  आणि संघावर आहे.पंडित नेहरू यांचा पूर्वग्रदूषित संघाबाबतचा दृष्टिकोन ,काश्मीर प्रश्नात संघाचे योगदान या साठी तर हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरते.

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचून विचार केला पाहिजे...

हिंदुस्थानच्या फाळणीची सखोल पार्श्वभूमीसह ,तपशीलवार अभ्यास करून मांडणी केलेला ग्रंथ ,जितका व्यापक तितकाच संदर्भ.! लेखकाचा स्वभावच'अभ्यासोनि प्रकटावे' असा आहे.त्याचा अनुभव या ग्रंथात पानोपानी येतो. 
५० पृष्टांचे परिशिष्ट आणि संदर्भ ग्रंथ सूची आहे.
हा ग्रंथ २६ प्रकरणे आणि ४७५ उपप्रकरणे किंवा बिंदुंच्या माध्यमातून साकारला आहे.
प्रत्येक मुद्द्याला शीर्षक दिलेले आहे.या सर्व मुद्द्यांचा अनुक्रमणिका(२० पेज) मध्ये समवेश केल्यामुळे नेमका संदर्भ हवा तेंव्हा शोधने सुकर झालेले आहे.

संदर्भ आणि नोंदी अधिक असतील तर अनेक वेळा ग्रंथ बोजड होतो.वाचनाला गती येत नाही.पण हा ग्रंथ अतिशय प्रवाही आणि प्रभावी आहे.सोपी आणि तरल अशी भाषा आहे.क्लिष्टता अजिबात नाही.त्यामुळं फाळणीचा इतिहास,पार्श्वभूमी आणि परिणाम सर्व एकत्र वाचायला मिळते आणि ते वाचावेसे वाटते.

अधोरेखित करायचे ठरले तर सगळं पुस्तकच अधोरेखित होईल,इतकी माहिती आपल्याला यात वाचायला मिळते.अनेक पत्र जे आपल्याला थक्क करून सोडतात.

"निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी...." - महात्मा गांधी "..... मला विचाराल, तर ब्रिटिश किंवा इतर कोणाही परकीय सत्तेच्या सुव्यवस्थेत राजवटीपेक्षा मी अराजकच अधिक पसंत करेल. इतर संस्थानिकांना मांडालिक बनवून किंवा सरहद्दीवरील मुसलमान टोळ्यांची मदत घेऊन निजाम भारताच्या गादीवर बसला, तर त्याला मी निश्चित मी निःसंदिग्ध संमती देईल. निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी राज्य आहे असे मी मानतो...

Saturday, 31 December 2022

'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस' पुस्तक

'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस'

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, संजीब चट्टोपाध्याय लिखित कादंबरीचा हा मराठी अनुवाद - 'भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस'

मराठी अनुवाद: रमा हर्डीकर सखदेव

पृष्ठ:१८०

मूल्य:२५०/




महाभारताचं महायुद्ध समाप्त झालं. कौरवांच्या कुळाचा पूर्ण संहार झाला होता. सगळी युद्धभूमी प्रेतांच्या खचाने भरुन गेली होती. रक्ताच्या ओहळांनी भिजून गेलेल्या भूमीवर, तो मुत्सद्दी राजकारणी, रणनीतीकार कृष्ण उभा होता. आणि त्याच्या आजूबाजूला होत्या कुरु स्त्रिया, ज्यांचे पती, बंधू, पिता आणि पुत्र युद्धात बळी गेले होते. त्या त्याला शिव्याशाप देत होत्या. या भयकारी स्थितीला जबाबदार कोण होता?

दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्वतः प्रभू, परमेश्वर, ज्याने स्वतः जाहीर केलं होतं की, पृथ्वीला पापांच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी तो अवतार धारण करेल. त्यामुळे जेव्हा मातांनी त्याला तुझ्या नशिबीदेखील असेच भोग येतील' असा शाप दिला, तेव्हा परमेश्वराने तो मंदस्मित करत शांतपणे स्वीकारला.

अशा प्रकारे या कादंबरीची सुरुवात होते, ज्यात लेखक संजीब चट्टोपाध्याय प्रभू कृष्णाच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या या अवताराच्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांकडे निर्देश करतात 

- गोकुळातला खट्याळ मुलगा, वृंदावनातला रहस्यमयी प्रेमिक, कंसाचा वध करणारा, द्वारकेमधला यादवांचा प्रमुख आणि अखेरीस कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाची आखणी करणारा मुत्सद्दी राजकारणी...!

ऑनलाइन खरेदी करण्यासाठी कॉमेंट करा..

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...